माजी विद्यार्थी मुलाखत - १ - नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा !

नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा! हे कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे ब्रीद वाक्य! हे आयुष्यात सत्य स्वरूपात उतरवणारे, जगणारे म्हणजे कैलास दादा व वैजयंता ताई जगदाळे. आपण आज त्यांची यशोगाथा पाहणार आहोत.

 · 5 min read


नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा ! हे ज्ञान प्रबोधिनीच्या शिवापूर येथील कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे ब्रीद वाक्य! हे आयुष्यात सत्य स्वरूपात उतरवणारे, जगणारे म्हणजे कैलास दादा व वैजयंता ताई जगदाळे. आपण आज त्यांची यशोगाथा पाहणार आहोत.


गराडे गावाच्या एका गरीब शेतकरी कुटुंबातील कैलास दादा. चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्या दोन्ही भावांनी शेती स्वीकारली व कैलास दादांनी उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. MA (Economics) केले. पण नोकरीसाठी बाहेर पडल्यावर नावाजलेल्या आईस्क्रीमच्या कंपनीमध्ये फक्त ८०० रुपये महिन्यावर नोकरी करावी लागली. एवढे शिक्षण असूनही एवढ्या कमी पगारात कसे भागायचे? काही स्वतःचे करण्याची संधी मिळत नव्हती, मन अस्वस्थ झाले. त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. तेव्हाच शिवापूर येथे लेथ यंत्रावर कामाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम नुकताच चालू झाला होता, ज्याची शैक्षणिक पात्रता फक्त आठवी पास होती. पण कुठली ही खंत किंवा लाज न बाळगता नवीन जोमाने ह्या मार्गावर सुरुवात केली. दिवसाचे ४-५ तास अध्ययन आणि दुसऱ्या/तिसऱ्या शिफ्ट मध्ये अनुभव मिळावा म्हणून कारखान्यात काम केले. १९९५ सालच्या लेथ मशीन अभ्यासक्रमाच्या तुकडीमधून कैलास दादा उत्तीर्ण झाले. अभ्यासक्रम संपल्यावरही प्रबोधिनीच्या तांत्रिक विद्यालयात मुलांची लेथ यंत्रावरची Practicals घेतली, आणि कारखान्यात काम चालू ठेवले. काही छोट्या स्वरूपाचे काम केंद्रातच आणून ते करून देणे व त्यामधून व्यवसायाचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना शिकवणे असेही सुरु झाले. अशी ४ वर्षे गेली.


तेव्हाच प्रबोधिनीच्या कॉम्प्युटर डिप्लोमा करण्याऱ्या वैजयंता ताईंशी त्यांची ओळख झाली. हुशार, चुणचुणीत, खमक्या आणि व्यावहारिक अशा वैजयंता ताई आणि कैलास दादा यांचा सहजीवनाचा प्रवास शिक्षण पूर्ण होताच सुरु झाला. वैजयंता ताईंनी प्रबोधिनीत नोकरी करून कैलास दादांना मानसिक, व्यावहारिक पाठबळ दिले. व्यवसाय उभा करणे हे दोघांचे ध्येय होते. ताईंच्या पगारात घर आणि दादांचे पैसे व्यवसायासाठी बाजूला ठेवण्यात आले. पहिले वापरलेले लेथ यंत्र १५००० रुपये साठवून घेतले. एका मित्राच्या गाळ्याचा कोपरा भाड्याने घेतला आणि काम चालू केले.


लेथ यंत्र याचा वापर कातारी कामासाठी होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात आणि ज्याने काम करायचे आहे त्याला टूल म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात. फेसिंग करणे :- दंडगोलाची लांबी कमी करणे, टर्निंग :- दंडगोलाचा व्यास कमी करणे, थ्रेडिंग :- आट्या पाडणे, ड्रिलिंग :- छिद्र पाडणे, बोरिंग/कौंटर बोरिंग :- असमान व्यासाचे छिद्र, चाम्परिंग :- धारदार/कोनेदार बाजूला सपाट/निमुळते करणे, नर्लिंग :- एखादी वस्तू पकडण्यासाठी /पक्कड (ग्रिप) मजबूत होण्यासाठी तयार केलेला आकार, टेपरींग :- दंडगोल निमुळता करणे. ॲटोमॅटीक लेथ, CNC लेथ, टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारची काही लेथ यंत्र बाजारात आहेत.



कैलास दादांच्या एका लेथयंत्राची पुढे ८ लेथ यंत्रे झाली आणि कामगार मिळत नाहीत म्हणून ३ CNC यंत्रेही झाली. आपली मराठी माणसे व्यवसायात आहेत म्हटल्यावर Kirloskar सारखे मोठे ग्राहक मिळाले. कायम उत्तम दर्जाचे काम दिल्याने काम तर कधी कमी पडलेच नाही, आणि Precision Engineering साठी प्रसिद्ध अशा जर्मनी देशात काम पोहोचले. 

आज २५ कामगारांना काम देऊ शकणारे कैलास दादा यांचा महिना ८०० रुपये ते महिना २ लाख रुपये पर्यंतचा प्रवास अतिशय कष्टाने, कामाप्रतीच्या निश्चयाने आणि आशावादी वृत्तीनेच होऊ शकतो. आजही यांत्रिकीचा गणवेश अतिशय स्वाभिमानाने घालणारे कैलास दादा लेथ यंत्रावर स्वतः काम करत असतात. ते हसत हसत म्हणतात, ” हात आणि डोकं सदैव चालू पाहिजे.”


त्यांचा मुलगा रोहित हा पण लहानपणा पासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन तरबेज झाला. लहानपणी calibration पासून लेथ यंत्रावरची कामे केली. एवढेच नव्हे तर स्वतःचे घर design केले. किर्लोस्करांकडे २ महिने काम शिकून आला आणि आज हा अजून अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम करीत असलेला मुलगा सगळ्या CNC यंत्रांचे programming आणि settings करायला लागला आहे. मोठ्या कंपन्यांच्या वातानाकुलित कार्यालयात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या चक्क नाकारून वडिलांच्या कारखान्यात पगारावर काम करतो! आज तिसरी शिफ्ट सांभाळतो. एकत्र कुटुंब असल्याने कैलास दादा आणि वैजयंता ताईंनी शिक्षणाला महत्त्व देऊन घरातील पुढची पिढी उच्च शिक्षित आणि सक्षम केली आहे.


आपल्या बरोबर कैलास दादांनी अनेक उद्योजक घडवले. आज ३ उद्योजक जे १०-१२ कामगार ठेऊन महिन्याचा ७०-८० हजार नफा कमावतात, अशी अनेक मुले इथे प्रशिक्षण घेऊन गेली. दादा कधीच कोणाला प्रशिक्षण द्यायला ‘नाही’ म्हणत नाहीत. दादांची एक हळहळ मनाला फारच व्यथित करून गेली, ती म्हणजे त्यांच्याकडे एकही कामगार महाराष्ट्रातला नाही, इतर राज्यांमधून आलेले कामगार आहेत. मराठी मुलांना आजकाल कष्ट करायला नकोत, हात काळे करायला नको वाटतात, त्यापेक्षा शहरात ५००० ची कारकुनी स्वीकारतात, पण छोटासा आपला स्वतःचा असा व्यवसाय करणार नाहीत, कारण बहुदा यात कष्ट आणि जोखीम दोन्ही आहे. हा खरच धोक्याचा आणि काळजीचा विषय आहे. ही परिस्थिती बदलावी व युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा यासाठीच प्रबोधिनीचे कौशल्य प्रशिक्षण केंद्र!



This is an inspiring story of Mr. Kailas Jagadale, Ex-student of JPSDC Shivapur, who completed the LATHE MACHINE OPERATOR course in 1995 at JPSDC SHIVAPUR & later he became an owner of a machining center. He reached his goal by implementing the MOTTO of JPSDC “Be a job creator not a job seeker " All the time through his career since 1995, he loved his work but not his job.


Mr. Kailas, born and brought up in a small village named GARADE in Pune district. His family members were farmers. His elder brothers joined the ancestral farming for life. However, Mr. Kailas decided to be a person with high educational qualifications & completed Masters in Economics.

After completion of education, he started career with a job in an ice cream manufacturing factory wherein he was getting salary of just 800 INR per month. The pay that he was receiving in spite of the qualification made him realise that he should follow extraordinary path to achieve his ambitions. Hence to pursue his dreams, he joined the LATHE MACHINE OPERATOR COURSE at JPSDC Shivapur in 1995. He would attend the training and also worked with industries for on hands on experience. Upon completion his training at JPSDC, he also volunteered to pass on the training to new students while working on Lathe Machine. Thus, he followed the way of earning while learning and completed the Lathe machine operator course. Initially, he would bring his jobs to the centre and would discuss with the new students of LATHE MACHINE OPERATOR COURSE. This went on for almost 4 years.


During this period, he also met one of our pupils of Computer training Ms. Vaijayantha tai and they felt they were compatible. They soon got married and started the journey of life together as husband and wife. Meanwhile Vaijayanta Tai also started teaching at JPSDC Shivapur, and she supported Mr. Kailas financially as well as morally, to achieve his goals.



Gradually they progressed and Mr. Kailas hired a small place and started his own machining center with one lathe machine. This small seed sowed and became a tree giving shelter to 25 workers and having 8 lathe machines and 3 CNC machines. His turnover reached to 2 lacks INR per month. His son, Rohit and Family members also completed their education. Rohit is now working in the workshop under his father’s guidance on as a regular employee. Rohit has created an example for the youth. This machining center got orders from Kirlosakar Group and their jobs reached to Germany also which is famous for precise work.


Mr. Kaillas is still guiding the new generation with his thoughts about growth and principled conduct of the business. He feels sorry about today’s youth from Maharashtra as the youth these days don’t want to do the hard work and are running after easy money. He is also sad that most of the people who came to him for employment, training and guidance are non-Maharashtrians. 


No comments yet.

Add a comment
Ctrl+Enter to add comment