पहिले यंत्र-परिचय शिबिर

उन्हाळी सुट्टीमध्ये एक आगळे वेगळे यंत्र-परिचय शिबिर घेण्यात आले! १८ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान इयत्ता १०वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रांमार्फत हे पहिले शिबिर संपन्न झाले.

 · 2 min read


इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत आपल्या केंद्रावर तंत्रशिक्षण विषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते. एकूण १६ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. शिबिरामध्ये कृती सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तांत्रिक कौशल्यांची ओळख करुन देणे आणि त्याविषयी आवड निर्माण करणे हे उद्दिष्ट होते.

शिबिराची सुरुवात स्फूर्तीदायी पद्य म्हणून व प्रबोधिनीच्या शिवापूर भागातील कामांच्या ओळखीने झाले. तसेच विद्यार्थ्यांनी एकमेकांशी व शिक्षकांशी ओळख करून घेतली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मापन कौशल्य (measurement) याबाबत माहिती दिली गेली. मापनाचे महत्व, उपयोग आणि त्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे units याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. यानंतर विद्यार्थिनींनी fashion designing तसेच विद्यार्थ्यांनी lathe मशीनचे भाग आणि त्यांचे कार्य याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.



दुसऱ्या दिवशी Lathe मशीन वर turning, facing operations करणे, computer वर ppt तयार करणे अशा गोष्टी घेण्यात आल्या. आपल्या काही माजी विद्यार्थ्यांनी चक्क प्लास्टीक बाटलीचा उपयोग करुन hydraulic rocket तयार करणे, ते यशस्वी २५ फुट उंच उडवणे आणि याद्वारे त्यामागचे विज्ञान प्रयोगातून समजून घेणे असे सत्र घेतले. Lathe मशीनवर एका विद्यार्थ्याने अगरबत्ती स्टँड design चा job पूर्ण केला, म्हणून त्याला तो भेट म्हणून देण्यात आला.



तिसऱ्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना रांजेश्वर मंदिर येथे घेऊन जाण्यात आले. मंदिर व परिसराची ओळख रांजे गावातील स्थानिक बाबा काकांनी विद्यार्थ्यांना करून दिली. आधीच्या अपूर्ण राहिलेल्या activities पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चौथ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी सुद्धा येण्याचे कबूल केले. चौथ्या दिवशी welding करुन माठाचे स्टँड तयार करणे, solar lab मध्ये PCB ला soldering करुन पणती तयार करणे अशा activities विद्यार्थ्यांनी केल्या. मोहन सर आणि निकम सर यांनी भविष्यातील तंत्रशिक्षणाच्या संधी आणि महत्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन शिबिराचा समारोप केला. शिबिरामध्ये प्रबोधिनीचे काही माजी विद्यार्थी सत्र घ्यायला सहभागी झाले होते. याप्रकारचे पुढचे शिबिर मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.


शशांक वैद्य

शिबिर समन्वयक



No comments yet.

Add a comment
Ctrl+Enter to add comment