प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण!

आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये वेल्डिंग विषयाचे प्रात्यक्षिक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रशिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून वेल्डिंग शेड तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला.

 · 1 min read


आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये वेल्डिंग विषयाचे प्रात्यक्षिक अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी वेल्डिंग शेडची आवश्यकता भासत होती. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून शेड तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला.


शेडचे काम 11 मार्च 2024 पासून सुरू झाले. फॅब्रिकेशनच्या कामामध्ये श्री रवींद्र खासबागेसर यांनी मार्गदर्शन केले. सर आपले माजी प्रशिक्षक आहेत व सध्या स्वतःचा याच क्षेत्रातील व्यवसाय आहे.

जागा ठरवणे, मोजणे, रेखाटन करणे, साहित्याची यादी तयार करणे, अंदाजे खर्च काढणे आणि रकमेची तरतूद झाल्यावर प्रत्यक्ष काम करणे असे सर्व विद्यार्थी व प्रशिक्षकांनी केले. रकमेची तरतूद ब्लूम कंबशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगातून झाली.शेड मोठी असल्याने खासबागे सरांकडील काही अनुभवी वेल्डरही मदतीसाठी आले होते. मुख्य शेडचे काम पूर्ण झाले असून शेडमधील साहित्य लाऊन घेणे व तशा रचना तयार करणे असे सुरु आहे. लवकरच या नवीन शेडमध्ये प्रात्यक्षिक करणे सुरु होईल.


No comments yet.

Add a comment
Ctrl+Enter to add comment